बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता आणि तिने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. यानंतर तिचे चाहते तिची काळजी करू लागले. पण सुष्मिता सेन आता बरी झाली आहे आणि तिने पुन्हा तिच्या रुटीनची सुरुवात केली आहे. अशातच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबर दिसत असल्याने आता त्यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

सुश्मिता सेन अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. तिचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ती नियमित व्यायाम करत असते. तर आताही तिने तिचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी तिच्याबरोबर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसत आहे. त्या दोघांना एकत्र पाहून सुश्मिताचे चाहते खूप आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा : “मी रागात होते अन् त्यांनी माझा हात पकडला…” सुष्मितानं सांगितला महेश भट्ट यांचा ‘तो’ किस्सा

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. तर यात सुष्मिता सेनची धाकटी मुलगीही तिच्यासोबत दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “इच्छा हा एकमेव मार्ग आहे. आता व्यायामची परवानगी मिळाली आहे. मी लवकरच जयपूरमध्ये आर्याच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. हे माझे जवळचे लोक जे मला पाठिंबा देत आहेत आणि मला माझ्या झोनमध्ये परत येण्यास मदत करत आहेत. अलिशा आणि रोहमन..खूप प्रेम.”

हेही वाचा : हृदयविकाराचा झटका आलेल्या सुश्मिता सेनला वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले “तुम्ही हृदयाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुष्मिता सेनच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी विविध अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिलं, “तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र पाहून आनंद झाला.” तर दुसरा म्हणाला, “मी प्रार्थना करतो की हे दोघं पुन्हा एकत्र यावेत.” तर आणखी एकाने अंदाज बांधला आणि लिहीलं, “हे दोघे पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले आहेत.” एका यूजरने लिहिले आहे की, “दोघे एकत्र चांगले दिसत आहेत.” आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.