Zeba Bakhtiar Marriages: एका पाकिस्तानी अभिनेत्रीने चार लग्नं केली. तिचे दोन पती भारतीय, तर दोन पाकिस्तानी आहेत. ऋषी कपूर यांच्याबरोबर ‘हिना’ चित्रपटातून लोकप्रियता मिळवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव झेबा बख्तियार. ९० च्या दशकात झेबाने बॉलीवूड चित्रपट केले होते. भारतीय अभिनयविश्वात यश मिळवणाऱ्या झेबा यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले.

झेबाने चार लग्नं केली. तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. झेबाचा जन्म १९६५ मध्ये पाकिस्तानमध्ये झाला. तिने पहिलं लग्न १९८२ मध्ये १७ व्या वर्षी केलं होतं. तिच्या पतीचं नाव सलमान गिलानी होतं, तो पाकिस्तानच्या क्वेटामध्ये राहायचा. हे लग्न फक्त ५ वर्षे टिकलं आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर झेबा बख्तियारची भेट प्रसिद्ध डान्सर व अभिनेता जावेद जाफरीशी झाली. दोघे मुंबईत भेटले होते. १९८९ मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं, पण दोन वर्षातच ते वेगळे झाले.

जावेद जाफरीपासून घटस्फोट घेतल्यानंतर गायक अदनान सामी झेबाच्या आयुष्यात आला. या दोघांनी १९९३ मध्ये लग्न केलं, पण झेबाचं हे लग्नही टिकलं नाही आणि ४ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले. अदनान व झेबा यांना एक मुलगा असल्याने या दोघांमधील कायदेशीर वाद बराच काळ चालला.

Zeba Bakhtiar
अभिनेत्री झेबा बख्तियार (फोटो – सोशल मीडिया)

अदनानपासून घटस्फोटानंतर काय म्हणाली होती झेबा?

“लग्नानंतर माझं डोकं ठिकाणावर राहिलं नव्हतं. स्पर्धेत टिकून राहायचं असल्याने मी काम करत होते, मला खूप समस्यांचा सामना करावा लागला, पण मला आनंद आहे की मला अजान (तिचा मुलगा) मिळाला. त्याच्या कस्टडीसाठी मी १८ महिने लढले. त्या काळात मी काम करत नव्हते. मग माझ्या मित्रांनी मला स्वतःसाठी काम करायला सांगितले,” असं अदनानबरोबरच्या घटस्फोटावर झेबा म्हणाली होती.

झेबाला बॉलीवूडमध्ये काम मिळणं बंद झालं, मग ती पाकिस्तान इंडस्ट्रीकडे वळली. ती तिकडेच मालिका व चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करू लागली.

झेबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने चार लग्नं केली. त्यापैकी जावेद जाफरी व अदनान सामी भारतीय, तर सलमान व सोहेल लगारी पाकिस्तानचे होते. तीन घटस्फोटानंतर झेबाने चौथं लग्न २००८ साली सोहेल लगारीशी केलं.