बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं १४ जून २०२२ रोजी निधन झालं होतं. मुंबईतील बांद्रा येथील भाड्याच्या निवासस्थानी त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा फ्लॅट बंद होता. तो कोणीच विकत घ्यायला तयार नव्हतं. हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मध्यंतरी यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये हा फ्लॅट ५ लाख रुपयांना भाड्याने दिला जात आहे, असं लिहिलं होतं. पण अखेर सुशांतने आत्महत्या केलेला फ्लॅट विकल्याचं समोर आलं आहे. बॉलीवूडमधल्या एका आघाडीच्या अभिनेत्रीनं हा फ्लॅट विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांनी शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “शेवटी सर्वांना…”

सुशांतच्या निधनानंतर बांद्रा स्थित फ्लॅट तीन वर्ष रिकामी बंद होता. अखेर हा फ्लॅट खरेदी केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आणि ‘द केरळा स्टोरी’ फेम अदा शर्मानं हा फ्लॅट विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. सुशांतच्या घराजवळील अदाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

यासंबंधित एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पापाराझी अदाला विचारतात की, ‘तू हा फ्लॅट विकत घेतलास की नाही? एवढंच सांग.’ यावर अदा म्हणते की, “जे काही असेल ते मी पहिल्यांदा तुम्हालाच सांगेल.”

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये उर्मिला निंबाळकर जाणार का? उत्तर देत म्हणाली, “दुसऱ्या पर्वात…”

हेही वाचा – “‘या’ अभिनेत्यामुळे मी आता दगडाबरोबरही रोमान्स करू शकते”; मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुशांत निधनानंतर त्याची हत्या असल्याचं बोललं जात होतं. पण पोलीस आणि सीबीआय म्हणण्यानुसार, सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला होता. सुशांत आता जरी या जगात नसला तरी त्याच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. सोशल मीडियावर नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच सुशांत सारखा हुबेहूब दिसणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. पण त्यानंतर तो एआय केलेला व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलं.