‘दे केरला स्टोरी’ या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा नेहमीच चर्चेत असते. तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम आहे. तसेच अदाला मराठी लोकं फार आवडतात हे तिनं एका मुलाखतीतूनही सांगितलं होतं. आता अदानं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्तानं अदानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अदा युकुलेलं वाजवत ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसतं आहे. हा व्हिडीओ शेअर करत अदानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा” अदाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिलाही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय काहींनी तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. अदाच्या या व्हिडीओला अवघ्या ३० ते ३५ मिनिटांमध्ये लाखोहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती १५’मध्ये होणार मोठा बदल, बिग बींनी केलं जाहीर; पाहा नवा प्रोमो

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’मधून बाहेर येताच आलिया सिद्दिकीचा सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यानं…”

यापूर्वी अदानं नऊवारी साडीतला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत अदा नऊवारी साडीत नवरीच्या लूकमध्ये दिसतं आहे. तसेच ती एका बाईकवर बसून पोझ देताना पाहायला मिळतं आहे. अदानं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “ज्यांनी मला नऊवारी साडी नेसायला सांगितली आणि ‘चिडलेली इडली’, ‘चवळी’ या माझ्या कवितेच्या चाहत्यांसाठी हा माझा लूक.” शिवाय तिनं या व्हिडीओच्या कमेंटमध्ये “कोणाला लिफ्ट पाहिजे?” असाही प्रश्न विचारला आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा – “प्रोटिन पावडरी घेऊन…,” पुण्यात कोयता हल्ल्यापासून तरुणीला वाचवणाऱ्या लेशपालबद्दल किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अदा जरी अमराठी असली तरीही तिला उत्तम मराठी बोलता येतं. तिनं यापूर्वी ‘चिडलेली इडली’, ‘चवळी’, ‘स्वप्नात पाहिली राणीची बागं’ अशा कविता सादर केल्या होत्या. अदाच्या या कवितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.