बहुचर्चित ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. अखेर आज(१६ जून) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशीच चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाचा थिएटरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रदर्शनावेशी चित्रपटगृहातील एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमकडून घेण्यात आला होता. या रिकामी ठेवलेल्या सीटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटगृहातील या सीटवर चाहत्यांनी हनुमानाच्या प्रतिमेची पूजा केली आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन सिनेमागृहातील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

हेही वाचा>> विराट कोहलीबरोबर जोडलं गेलेलं तमन्ना भाटियाचं नाव, डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर, म्हणालेली, “मी आणि विराट…”

या व्हिडीओमध्ये सिनेमागृहातील रिकाम्या सीटवर चाहते हनुमानाची प्रतिमा ठेवून पूजा करताना दिसत आहेत. हळद-कुंकू वाहून प्रतिमेला पुष्प अर्पण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. प्रसाद म्हणून केळीही दाखवण्यात आल्याचं दिसत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या सिनेमागृहातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…

दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमात प्रभास, क्रिती सेनॉन सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रृपनखेच्या भूमिकेत आहे.