ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज(१६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने लाखोंची कमाई केली आहे. बहुचर्चित असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मुव्हिजरुल्झ आणि इतर पायरसी साइट्सवर ‘आदिपुरुष’ चित्रपट लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा थोडा फार परिणाम होणार असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.

A young man died in a two wheeler accident mumbai
दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
A two and a half year tiger, Ballarpur Forest, tiger died in a fight between two tigers, Chandrapur Six Tigers Dead in Ten Months, tigers dead in Ballarpur Forest, Chandrapur news, tiger news,
चंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत एका अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
tichi bhumika, Loksatta, special program,
दिग्गजांच्या नजरेतून ‘ती’च्या भूमिकांचा वेध; ‘लोकसत्ता’च्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध
vanchit, Karan Gaikar, Malti Thavil,
वंचितचेही शक्तिप्रदर्शन; करण गायकर, मालती थवील यांचे अर्ज दाखल
malavya rajyog 2024
मे महिन्यात शुक्र ग्रहात बनणार ‘मालव्य राजयोग’; या राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
12-year-old child molested by minors
मुंबई : १२ वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

हेही वाचा>> Video : हनुमानाच्या प्रतिमेची पूजा केली, प्रसाद म्हणून केळी दाखवली अन्…; ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या चित्रपटगृहातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘आदिपुरुष’ चित्रपट हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ५०० कोटी खर्च केले आहेत. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील व्हीएफएक्सवरुन टीका करण्यात आली होती. त्यानंतर व्हीएफएक्सवर अधिक पैसे खर्च करुन त्यात बदल करण्यात आले होते.

हेही वाचा>> विराट कोहलीबरोबर जोडलं गेलेलं तमन्ना भाटियाचं नाव, डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर, म्हणालेली, “मी आणि विराट…”

रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रृपनखेच्या भूमिकेत आहे.