बॉलीवूडमधील रोमॅंटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी नुकतीच आनंदाची बातमी जाहीर केली आहे. खूप वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने २०१८ साली लग्न केलं. अवघ्या पाच वर्षांनी आता दोघंही पालकत्व स्वीकारण्यास तयार आहेत.
या कपलने गुरुवारी (२९ फेब्रुवारी २०२४) आपल्या इन्स्टाग्रामवर क्रिएटिव्ह कार्ड शेअर करत प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली. हे कपल नवीन पाहुण्याचं स्वागत सप्टेंबर २०२४ ला करणार आहेत, असं या कार्डवरून दिसतंय. कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना रणवीर आणि दीपिकाची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.
राजीव मसंद यांना दिलेल्या जुन्या मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली होती की, जर ती अभिनेत्री नसती तर नक्कीच ती तीन मुलांबरोबर आनंदी कुटुंबात आपलं सुखी आयुष्य जगत असती.
हेही वाचा… पूजा सावंतच्या लग्नात सुखदा खांडकेकरच्या नखांची चर्चा; अभिनेत्रीकडून फोटो शेअर; म्हणाली, “आज या…”
“मला मरण येण्याअगोदर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे, मला भरपूर मुलं हवी आहेत. मला कुटुंबाचं महत्त्व कळतं आणि माणूस म्हणून आपलं एक कुटुंब असणं ही भावना मला परिपूर्ण करते. मी लहान बाळांचे फोटो पाहते तेव्हा मला जाणवतं की, मला लहान मुलं किती आवडतात”, असंही दीपिका म्हणाली होती.
हेही वाचा… “आली चाहूल कुणाची…”; तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या लग्नातील गाणं होतयं व्हायरल
रणवीरनेसुद्धा सुखी कुटुंबाची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याला दीपिकासारखी मुलगी हवी आहे असंही म्हटलं होतं. २०२१ रोजी सुरू असलेल्या रणवीरच्या ‘बिग पिक्चर’ या शोमध्ये तो एकदा म्हणाला होता की, “लहानपणी दीपिका खूप क्यूट दिसायची. मी तिच्या लहानपणीचे फोटो रोज बघतो आणि तिला सांगतो की, एक असं क्यूट बाळ मलापण दे, मग माझं आयुष्य एकदम सेट होईल.”
२० फेब्रुवारीला दीपिका प्रेग्नेंट असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर २९ फेब्रुवारीला दोघांनीही अधिकृतरित्या या बातमीवर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ
दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांंचा १४ नोव्हेंबर २०१८ रोजी भव्य लग्नसोहळा पार पडला होता. डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघांनी इटलीची निवड केली होती. लग्नाच्या पाच वर्षांनंतर आता रणवीर दीपिकाने गुड न्यूज दिली आहे. दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘फायटर’ या चित्रपटांमध्ये झळकली होती.