बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. कार्तिक पुन्हा त्याच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शहजादा’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिकसह या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन टिकिट बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आठ कोटींची कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. परंतु, याशिवाय ‘शहजादा’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल ६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपये कमावले आहेत.

आणखी वाचा : हॉट निळ्या टॉप आणि जीन्समध्ये संदीपा धारचा बोल्ड अंदाज; अभिनेत्रीच्या हातात सिगारेट पाहून चाहते म्हणाले…

कार्तिक आर्यनची ही क्रेझ ही सध्या चांगलीच वाढली आहे. नुकतंच कार्तिक आर्यनने दुबईमध्ये हजेरी लावली. त्याच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटाचा टीझर जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर झळकला. तेव्हा कार्तिकसुद्धा तिथे उपस्थित होता. दुबईतही त्याचं प्रचंड फॅन फॉलोइंग असल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर कार्तिकच्या ‘शेहजादा’चं टीझर या मोठ्या इमारतीवर झळकल्याने त्याच्या चाहतावर्गात आणखीनच भर पडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’ चित्रपट येत्या शुक्रवारी १७ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सनॉनसह राजपाल यादवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलेल्या ‘पठाण’ला टक्कर देणार का? हे पाहावं लागेल.