विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं होतं. टीझरपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण तरीही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली. आता पुन्हा विपुल शहा आणि सुदीप्तो सेन एका नव्या चित्रपटासह आपल्यासमोर येणार आहेत.

ही जोडी आता ‘बस्तर’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल फारसं भाष्य केलेलं नसलं तरी हा चित्रपट सत्यघटनांवरच बेतलेला असणार आहे असा अंदाज आहे.

आणखी वाचा : OTT प्लॅटफॉर्म्स ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट विकत घेण्यास तयार नाहीत; सुदीप्तो सेन म्हणाले, “आम्हाला शिक्षा…”

चित्रपटाचं पोस्टर पाहता हा चित्रपट नक्षलवाद आणि कम्युनिस्ट विचारधारेवर भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होत आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड ३ एक्स्पर्ट तरण आदर्श यांनीही हे पोस्टर शेअर करत आगामी चित्रपटाची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदीप्तो सेनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याहून अधिक चित्रपटाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. विपुल अमृतलाल शाह यांचा हा ‘बस्तर’ पुढील वर्षी म्हणजेच ५ एप्रिल २०२४ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘द केरला स्टोरी’च्याच टीमच्या या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.