Ahaan Panday’s Rumoured Girlfriend Shruti Chauhan Praises Saiyaara Movie : ‘सैयारा’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मोहित सुरींच्या या चित्रपटातून अहान पांडेनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातील या चित्रपटात त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक कलाकार मंडळींनीही चित्रपटातील त्याच्या कामाचं कौतुक केलं. अशातच आता अभिनेत्याच्या कथित गर्लफ्रेंडनंही त्याच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
अहान पांडे व अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सैयारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालताना दिसतोय. प्रेक्षकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. तर बॉलीवूडमधील आलिया भट्ट, रणवीर सिंह, शर्वरी वाघ यांसारख्या अनेक मंडळींनी सोशल मीडियामार्फत या चित्रपटाचं आणि चित्रपटातील अहान पांडे व अनित पड्डा या कलाकारांचं कौतुक केलं. आता चित्रपटातील मुख्य नायक अहान पांडेच्या कथित गर्लफ्रेंडनंही सोशल मीडियामार्फत त्याचं कौतुक केल्याचं दिसतं.
अहानची कथित गर्लफेंड श्रुती चौहान हिनं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं. त्यामध्ये तिनं अहानचंही भरभरून कौतुक केल्याचं दिसतं. तिनं स्टोरी पोस्ट करीत अहानबद्दल म्हटलं, “ज्या मुलानं आयुष्यभर हे स्वप्न पाहिलं, ज्यानं कोणाचाही विश्वास नसताना स्वत:वरचा विश्वास कमी होऊ दिला नाही. हे सगळं तुझं आहे अहान पांडे. आय लव्ह यू, मला तुझा अभिमान आहे, तुला मोठ्या पड्यावर पाहून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आहेत”.
श्रुती पुढे म्हणाली, “मी तुझ्यासाठी प्रार्थना करते की, तुझ्या वाट्याला अशा गोष्टी अजून याव्यात. जगाला आता तू कळणार आहेस, तू काय करू शकतोस हे कळेल”. श्रुतीनं यासह ‘सैयारा’चे दिग्दर्शक मोहित सुरी व अहान पांडेसह मुख्य भूमिकेत झळकलेल्या अनित पड्डाचंही कौतुक केलं आहे. ती म्हणाली, “मोहित सुरी तुम्ही अप्रतिम चित्रपट बनवला आहे. अनित पड्डा तू खूप कमालीचं काम केलं आहेस”.

अहान पांडेची कथित गर्लफेंड श्रुती चौहान कोण आहे?
श्रुती चौहान ही बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल आहे. तिनं रणवीर सिंह व आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गलीबॉय’ चित्रपटात माया हे पात्र साकारलं होतं. त्यापूर्वी तिनं ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातही काम केलं होतं. तसेच जुबिन नौटियालसह ‘हद से’ या गाण्यातही श्रुती झळकली होती.