Saiyaara becomes highest grossing Bollywood film overseas: मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. अनित पड्डा व अहान पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

अनित पड्डाने या चित्रपटाआधी काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच ‘सलाम व्येंकी’, ‘बिग गर्ल्स डोंट क्राय’ अशा चित्रपटांतदेखील काम केले आहे. मात्र, अनितला ‘सैयारा’ या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली, तर अहान पांडेने ‘सैयारा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे तर पाहायला मिळतच आहे, पण याबरोबरच, ‘सैयारा’ने आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. कमाईच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर विकी कौशलच्या गाजलेल्या ‘छावा’ला मागे टाकत सैयाराने बाजी मारली आहे.

‘सैयारा’ची एकूण कमाई किती?

सॅल्कनिकनुसार, छावाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ९१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना व अक्षय खन्ना हे प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता सैयाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर ९४ कोटींची कमाई करत छावाला मागे टाकले आहे. यासह सैयारा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉलीवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘हाऊसफुल ५’ने ७०.२५ कोटींची कमाई केली होती. ‘सितारे जमीन पर’ने ६६.७५ कोटींची कमाई केली होती आणि ‘मर्डर मुबारक’ने ५४ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘थुडरम’ या चित्रपटालादेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे टाकले. या चित्रपटाने ९३.८० कोटींची कमाई केली होती. मोहनलाल यांच्या ‘एल २: एम्पुरान’ या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. १२४.५० कोटींची कमाई केली आहे, त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांमध्ये सैयारा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर एकूण ४१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रेक्षक चित्रपटगृहांत मोठमोठ्याने रडत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी हे पैसे देऊन अशा प्रकारे प्रमोशन केल्याचे म्हटले आहे. मात्र, निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या खऱ्या भावना असल्याचे म्हटले आहे.