Aishwarya Rai Aaradhya Bachchan Video: अभिनेत्री ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनपासून विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाशी संबंधित बातम्या येत आहेत. ऐश्वर्या मुलीबरोबर वेगळी राहते, तर अभिषेक बच्चन ‘जलसा’ बंगल्यात आई जया बच्चन व वडील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर राहतो, असं म्हटलं जात आहे. याच सर्व चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुंबईतील ‘जलसा’ (Jalsa Bangalow) या तिच्या सासरच्या घरी दिसली. तिच्याबरोबर मुलगी आराध्या बच्चनही होती.
इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. ऐश्वर्याने ऑलिव्ह हिरव्या ग्रीन रंगाचा ड्रेस घातला आहे, तर आराध्या थेट शाळेतून आल्यासारखी वाटत होती, कारण तिने तिचा शाळेचा गणवेश घातलेला दिसतोय. या दोघीही मायलेकी कारमधून उतरून लगेच आत गेल्या.
अनंत-राधिकाच्या लग्नापासून होत आहेत चर्चा
नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात या जोडप्याने मीडियासाठी वेगवेगळ्या पोज दिल्या होत्या. अभिषेक बच्चन वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन नंदा तसेच तिची मुलं नव्या नवेली व अगस्त्य यांच्याबरोबर आला होता. तर ऐश्वर्या फक्त लेक आराध्याबरोबर आली होती. त्यानंतर या दोघांमध्ये सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. पण अद्याप दोघांनीही त्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच ऐश्वर्या व आराध्या दोघीही अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
ऐश्वर्या व आराध्या व्हेकेशनला एकत्र जातात, त्यांच्याबरोबर सहसा अभिषेक बच्चन दिसत नाही. नुकत्याच त्या दोघी न्यूयॉर्कला फिरायला गेल्या होत्या. त्यानंतर अभिषेक बच्चन आई व बहिणीबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. अभिषेक नेहमी त्याच्या घरातील इतर सदस्यांबरोबर दिसतो तर आराध्या व ऐश्वर्या एकत्र दिसतात. त्यामुळेच अभिषेक व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत असतात. या जोडप्याच्या लग्नाला आता १७ वर्षे झाली आहेत. त्यांची मुलगी आराध्या बच्चन ही १२ वर्षांची आहे.