Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan: बॉलीवूडमधील बहुचर्चित कपलपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन. या दोघांच्या कामाची जितकी चर्चा असते, तितकीच दोघांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली असते. गेल्या कित्येक महिन्यांपासून ऐश्वर्या व अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा होतं आहे. पण, दोघं कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकत्र दिसून या चर्चांना पूर्णविराम देताना पाहायला मिळत आहे. नुकतेच दोघं ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नात एकत्र पाहायला मिळाले. लग्नातील ऐश्वर्या, अभिषेक आणि लेक आराध्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

ऐश्वर्या राय-बच्चनची चुलत बहीण श्लोका शेट्टीच्या भावाचं लग्न रविवारी, ३० मार्चला पुण्यात होतं. या लग्नाला ऐश्वर्याने खास अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चनसह हजेरी लावली होती. लग्नात तिघं कुटुंबीयांबरोबर एन्जॉय करत फोटो काढताना दिसले.

एका व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन नवरा-नवरीबरोबर पोझ देताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये ऐश्वर्या लाइम कलरच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसंच अभिषेक गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये पाहायला मिळत आहे, तर आराध्याने आइवरी कलरचा अनारकली ड्रेस घातला आहे. तिघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “आता घटस्फोटाच्या चर्चा थांबवा. ऐश्वर्या व अभिषेक एकत्र खूप आनंदी आहेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “दोघं एकत्र खूप छान दिसत आहेत.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आराध्या खूप सुंदर दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या राय-बच्चन व अभिषेक बच्चनचं लग्न २००७ मध्ये झालं होतं. त्यानंतर २०११ मध्ये दोघं पहिल्यांदा आई-बाबा झाले. ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. पण, गेल्या कित्येक महिन्यांपासून दोघांमध्ये बिनसलं असल्याचं म्हटलं जात आहे. यावर अद्याप ऐश्वर्या व अभिषेकने कोणतं भाष्य केलं नाही. मात्र, नेहमी दोघं आपल्या कृतीतून एकत्र असल्याचं दाखवून देत असतात. ऐश्वर्या व अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘पोन्नियिन सेलवन २’नंतर अभिनेत्रीच्या कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही. तसंच अभिषेक बच्चन अलीकडेच ‘बी हॅप्पी’ चित्रपटात झळकला होता. आता लवकरच त्याचा ‘हाउसफुल्ल ५’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.