Aishwarya Rai Daughter Aaradhya GSB Bappa Darshan Video: सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. तसेच बरेच सेलिब्रिटी लालबागचा राजा व इतर ठिकाणी बाप्पाच्या दर्शनाला जात आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या बच्चन मुंबईत जीएसबी गणेश उत्सवात सहभागी झाल्या. दोघींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या सेलिब्रेशनमधील त्यांच्या एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या जीएसबी मंडळाच्या गणपतीचे आशीर्वाद घ्यायला जाताना गर्दीपासून आराध्याचे रक्षण करताना दिसली. दोघी हसून चाहत्यांना भेटल्या. तसेच थोडं अंतर राखून त्यांनी चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले.
ऐश्वर्या व आराध्याचे फोटो- व्हिडीओ
व्हिडीओ आणि फोटोंमध्ये, ऐश्वर्या एका सुंदर पांढऱ्या सूटमध्ये दिसत आहे. तिने लाल लिपस्टिक लावली आहे आणि छोटी टिकली आहे. दुसरीकडे, आराध्याने पिवळा कुर्ता घातल्याचं पाहायला मिळतेय. दोघींनी गणपतीसमोर हात जोडून फोटो काढले. दरवर्षी गणेश चतुर्थीला ऐश्वर्या जीएसबी मंडळाच्या गणपतीच्या दर्शनाला जाते. गेल्या वर्षी, ऐश्वर्या आराध्या आणि तिची आई वृंदा राय यांच्याबरोबर इथे दर्शनाला आली होती. मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही तिच्याबरोबर अभिषेक बच्चन नव्हता.
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी २००७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना लग्नानंतर ४ वर्षांनी २०११ मध्ये मुलगी आराध्या झाली. ऐश्वर्या व अभिषेक लेक आराध्याला घेऊन फिरायला जात असतात. नुकतेच हे तिघेही सुट्टीवरून परत येत असताना मुंबई विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.
ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात विक्रम, रवी मोहन, कार्ती, त्रिशा कृष्णन, जयराम, प्रभू, आर. सरथकुमार, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू, प्रकाश राज, रहमान, आणि आर. पार्थिवन यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर ऐश्वर्याच्या कोणत्याही आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आलेली नाही.