Aishwarya Rai ramp walk video: अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. आजही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

ऐश्वर्या राय ‘पॅरिस फॅशन वीक’साठी पॅरिसला गेली आहे. आता या कार्यक्रमातील ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय रॅम्प वॉक करताना दिसत आहे.

यावेळी तिने तिच्या वेगळ्या अंदाजात चाहत्यांची मने जिंकली. तिने रॅम्पवर नमस्कार करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने काळ्या रंगाची पॅन्ट आणि त्याच रंगाचे ब्लेझर परिधान केले होते. तिचा हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. तसेच, अनेकांनी ती क्वीन का आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे म्हटले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “खूप सुंदर.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “देवी.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “ऐश्वर्या गायब होते आणि पुन्हा जगाला हे सांगण्यासाठी समोर येते. ती क्वीन का आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “तुला पुन्हा बघून खूप आनंद झाला. तू खूप चांगली आई, पत्नी आणि सून आहेस. आता ही वेळ स्वत:साठी काहीतरी करण्याची आहे. तू क्वीन आहेस.”

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “पृथ्वीवर देवी अवतरली आहे.” एका नेटकऱ्याने लिहिले, “ऐश्वर्याइतके सुंदर कोणीही असू शकत नाही.” अशा अनेकविध कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

ऐश्वर्या राय कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसते. जेव्हा ती पॅरिसमध्ये पोहोचली, तेव्हाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक चाहती तिला पाहिल्यानंतर रडत असताना ऐश्वर्याने स्वत: जाऊन तिचे डोळे पुसते आणि तिच्याशी बोलते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला प्रतिसाद दिला आहे.