Aishwarya Rai Viral Video: अभिनेत्री ऐश्वर्या राय ही पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी ती पॅरिसला गेली आहे. तिला पुन्हा एकदा रॅम्प वॉक करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासह पॅरिसमध्ये पोहोचली आहे. त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व आराध्या त्यांच्या कारमधून उतरून हॉटेलकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यादरम्यान, अनेक चाहते ऐश्वर्याला भेटण्यासाठी अनेक चाहते तिथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या निळ्या सूटमध्ये सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिचे केस मोकळे आहेत. तिचा हा लूक लक्षवेधी ठरत आहे. दुसरीकडे, आराध्याने जीन्स, टी शर्ट आणि डेनिमचे जॅकेट घातले आहे. ऐश्वर्या व आराध्या हॉटेलमध्ये जात असताना चाहते त्यांना फोटोसाठी थांबवले. त्यानंतर ऐश्वर्यादेखील प्रेमळपणे त्यांच्याबरोबर फोटो काढत असल्याचे दिसते.
ऐश्वर्या रायला पाहिल्यानंतर चाहतीला अश्रू अनावर
आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिला एक चाहती भेटते. ती रडत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ऐश्वर्याला पाहिल्यानंतर चाहतीचे अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. कारमध्ये बसण्याआधी ऐश्वर्या त्या चाहतीजवळ गेली आणि तिला समजावले. तिच्याशी बोलली. इतकेच नाही तर तिने तिचे अश्रुही पुसले. तिला श्वास घ्यायला सांगितले. तिचा हात हातात घेतला आणि तिच्याबरोबर फोटोसाठी पोजही दिली.
नेटकरी म्हणाले?
या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “ती खूप गोड आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “क्वीन”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “ती ऐश्वर्या राय आहे. सगळ्यात सुंदर आणि प्रेमळ व्यक्ती आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “जया बच्चन यांच्या तुलनेत ऐश्वर्या खूप दयाळू आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “ती खूप गोड आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळाले. ती म्हणजे, आराध्या प्रत्येक व्हिडीओमध्ये कॅमेरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. हॉटेलमध्ये जात असतानादेखील ती पटकन आत गेली. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर जेव्हा चाहत्यांबरोबर फोटो काढण्यासाठी थांबली तेव्हा आराध्या थांबली नाही. ती लगेच कारमध्ये बसली.
आराध्या अनेक ठिकाणी ऐश्वर्यासह हजेरी लावते. ती कॅमेरासाठी पोजदेखील देते. यावेळी मात्र तिने कॅमेरासमोर थांबणे टाळल्याचे दिसले. दरम्यान, ऐश्वर्याचा पॅरिस फॅशन वीकमधील लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.