scorecardresearch

Bholaa Box Office Collection : अजय देवगणच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई सुरूच; पहिल्याच वीकेंडला कमावले ‘इतके’ कोटी

तिसऱ्या दिवशी हे कमाईचे आकडे नक्कीच वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत

bholaa box office collection day 3
भोला बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो : सोशल मिडिया)

Bholaa Box Office Collection Day 3 : अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. अशातच पहिल्या दोन्ही दिवशी चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे.

पहिल्या दिवशी ‘भोला’ने १० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा चित्रपट कमाईत थोडा मागे पडला, दुसऱ्या दिवशी याने ७.४० कोटीचा व्यवसाय केला आहे. आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारचे आकडे समोर आले आहेत. या तिसऱ्या दिवशी मात्र हे आकडे नक्कीच वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत.

आणखी वाचा : Bholaa Movie review : अजयचा जबरदस्त अंदाज, तब्बूचा पोलिसी खाक्या, जबरदस्त ॲक्शनची मेजवानी असलेला ‘भोला’

अजय देवगणच्या ‘भोला’ने तिसऱ्या दिवशी तब्बल १२.१० कोटींचा व्यवसाय केला आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने ३० कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आकडे समोर आणले आहेत. अजय देवगणचा हा ‘भोला’ हा चित्रपट ‘दृश्यम २’प्रमाणे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यात यशस्वी होणार का? हे येणारी वेळच ठरवेल.

‘भोला’चं बजेट १२५ कोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे येत्या विकेंडला या चित्रपटाने अधिक कमाई करणं अपेक्षित आहे. याबरोबरच नानीच्या ‘दसरा’ या दाक्षिणात्य चित्रपटसुद्धा भोलाबरोबरच प्रदर्शित झाला आहे. ‘भोला’मध्ये अजय देवगण, तबू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 16:32 IST

संबंधित बातम्या