अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेरीस १८ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. २०१५मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना अधिक भावली. सात वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या या दुसऱ्या भागालाही प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. ‘दृश्यम २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

आणखी वाचा – अजय देवगणच्या ‘दृश्यम २’मुळे मराठी चित्रपटाचे शो रद्द? दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला, सरकारला विनंती करत म्हणाला…

‘दृश्यम २’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी ३८ लाख रुपये कमाई केली. दुसऱ्या दिवशी या आकड्यामध्ये आणखीनच वाढ झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २१ कोटी ५९ लाख रुपये कमाई केली. आता चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशीची आकडेवारीही समोर आली आहे.

अर्ली ट्रेंड्सच्या वृत्तानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी तब्बल २५ कोटी रुपये कमाई केली आहे. म्हणजेच आतापर्यंत चित्रपटाने तीन दिवसांमध्येच ६० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे.

आणखी वाचा – भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीचीच हवा, नव्या वहिनीचं केलं जोरदार स्वागत, फोटो शेअर करत म्हणाली…

‘दृश्यम २’मध्ये अजय देवगणसह तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेचेही चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहेत. आता हा चित्रपट लवकरच १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठणार असे अंदाज वर्तवले जात आहेत.