अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेदचा चेहराच बदलला, झाली अशी अवस्था की फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनीही उडवली खिल्ली

अजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘भोला’चा दुसरा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. टीझरमधील अजयचा लूक खरंच अंगावर काटा आणणारा आहे. प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला अजयचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा टीझर

अजयची टीझरमधील भेदक नजर विशेष लक्षवेधी ठरत आहे. तर तब्बूचीही ‘भोला’च्या टीझरमध्ये झलक पाहायला मिळत आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत. तसेच टीझरमधील संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तब्बू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचं या टीझरमधून लक्षात येतं.

आणखी वाचा – आधी ओलीचिंब भिजत वनिता खरातने नवऱ्याला केलं किस, आता मिठी मारत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भोला’चा टीझर पाहिल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तसेच चित्रपट सुपरहिट ठरणार असं प्रेक्षक अजयचा लूक पाहिल्यानंतर म्हणत आहेत. ‘भोला’ हा दाक्षिणात्या चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.