Ajay Devgn had to rescue Deepak Dobriyal on Son of Sardaar 2: अजय देवगण व मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात दीपक डोबरियालदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

सध्या चित्रपटातील सर्वच कलाकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. विविध ठिकाणी ते हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ते चाहत्यांबरोबर संवाददेखील साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच या सिनेमातील कलाकारांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला.

‘सन ऑफ सरदार २‘मध्ये दीपक डोबरियाल यांनी महिलेची भूमिका साकारली आहे. संजय मिश्रा यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी दीपक यांना पहिल्यांदा महिलेच्या भूमिकेत पाहिले. त्यावेळी ते अभिनेत्याला ओळखू शकले नाहीत. त्यांना वाटले की एखाद्या सुंदर महिलेसोबत वेळ घालवायला मिळेल. पण, मला नंतर समजले की दीपक महिलेच्या वेशभूषेत आहे.

रवी किशन म्हणाले की तो स्त्री भूमिकेत खूप सुंदर दिसत होता. तो अगदी महिलेसारखा दिसत होता. सेटवरील अर्धे अधिक लोक त्याच्यावर फिदा झाले होते. ६.५ फूट उंचीचा एक सरदार दीपक डोबरियालशी लग्न करण्यास तयार होता. ज्या पद्धतीने तो स्त्री भूमिकेत होता, त्या पद्धतीने त्याने स्वत:ला सावरले ते उत्तम होते.

अजय देवगण पुढे म्हणाला की, पॅकअपनंतर कलाकार जेव्हा जेवायला बाहेर जायचे, तेव्हाही दीपक डोबरियाल त्याच महिलेच्या वेशभूषेत असत. त्यामुळे लोकांचे त्याच्याकडे सर्वाधिक लक्ष वेधले जायचे. तो स्त्रीचा वेश परिधान करून पुरुषांच्या स्वच्छतागृहात शिरायचा. त्याला पाहून लोकांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेने बाहेर उभे राहायचो. लोक ओरडत असत.

दीपक डोबरियाल पुढे म्हणालe की, एक बाई चुकून पुरुषांच्या स्वच्छतागृहात आली होती. तिने मला पाहिले आणि मला ती स्त्रियांच्या स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेली, कारण तिला वाटले की मी महिला आहे. यामध्ये अजय देवगणला मध्यस्ती करावी लागली आणि सांगावे लागले की तो मुलगा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सन ऑफ सरदार २’बाबत बोलायचे तर हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल आहे. या चित्रपटातील दोन गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांतील डान्स स्टेप्सने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता २५ जुलै २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.