Son Of Sardaar 2 Title Song : अभिनेता अजय देवगण व मृणाल ठाकूर लवकरच ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटातून झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता या चित्रपटाचं शीर्षक गीत प्रदर्शित झालं आहे. या शिर्षक गीताचं नाव ‘पेहला तू दुजा तू’ असं आहे.

‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातून अजय देवगण व मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत, त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच अजय व मृणाल यांच्या चित्रपटाचं शिर्षक गीत प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘पेहला तू दुजा तू’ हे शिर्षक गीत सोमवारी ७ जुलै रोजी प्रदर्शित झालं. यामध्ये मृणाल व अजय दोघे गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. यामध्ये ‘पेहला तू, दुजा तू, तिजा तू, चौथा तू’, अशी एक ओळ आहे. यावर हे दोघे त्यांच्या हाताच्या बोटांनी हुक स्टेप करताना पाहायला मिळतात. परंतु, या गाण्यातील कोरिओग्राफी प्रेक्षकांना फारशी आवडलेली नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी अजय देवगण व गाण्याच्या कोरिओग्राफरला ट्रोल केल्याचं पाहायला मिळतं.

सोमवारी ७ जुलैला हे शिर्षक गीत यूट्यूबवर प्रदर्शित झालं होतं. यासह गाण्याची छोटी झलक इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आली. यावर नेटकऱ्याने त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी “एकाने धूम धामनंतर अजय देवगणच्या या नवीन युनिक स्टेप्स आहेत”, “या चित्रपटानंतर मृणालचं नाव खराब नाही झालं पाहिजे”, “ही ऑस्कर लेवलची कोरिओग्राफी कोणी केली आहे?” अशा गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

‘पेहला तू दुजा तू’ गाण्याबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अजय देवगणबद्दल बोलायचं झालं तर त्याला नृत्य करायला आवडत नाही असं त्याने व त्याच्या इतर चित्रपटातील सहकलाकारांनी अनेकदा मुलाखतींमधून सांगितलं आहे, त्यामुळे त्याच्या गाण्यांचे हुक स्टेप्स खूप सोपे असतात. ‘धुम धाम’, ‘पो पो’, ते ‘पेहला तू दुजा तू’ या सर्वच गाण्यांमधील हुक स्टेप खूपच सोप्या असल्याचं पाहायला मिळतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट येत्या २४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या आठवड्यातच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग ‘सन ऑफ सरदार’ २०१२ साली प्रदर्शित झाला होता, यामध्ये अजय देवगण व सोनाक्षी सिन्हा झळकले होते.