scorecardresearch

Premium

Video: माफी मागितल्यानंतर पुन्हा पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला अक्षय कुमार, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “चित्रपट फ्लॉप…”

गेल्या वर्षी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीबद्दल मागितली होती माफी, आता अजय अन् शाहरुखबरोबरचा व्हिडीओ व्हायरल

Akshay Kumar in new pan masala ad with Ajay Devgn Shah Rukh
अक्षय कुमारची नवीन जाहिरात (फोटो – ट्विटर व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला, पण तो सध्या या चित्रपटामुळे नाही तर नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. मागच्या वर्षी जाहीर माफी मागणारा अक्षय पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला आहे. या जाहिरातीत अक्षयबरोबर अजय देवगण व शाहरुख खानदेखील दिसत आहेत. नेटकरी जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत अक्षयवर टीका करत आहेत.

इस्रायल व हमासचा उल्लेख करत बॉलीवूड अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोला; म्हणाला, “त्यांना अभिमान…”

Both hit and flop are important for an actor tripti dimri
‘हिट’ आणि ‘फ्लॉप’ दोन्ही अभिनेत्यासाठी महत्त्वाचं! – तृप्ती डिमरी
Vijay Sethupati Co-actress Dies As Drunk Son Beats Her Kadaisi Vivasayi actor Kasiammal Son Arrested For Killing Mother at 74
विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक
Irfan Pathan and Safa Baig Wife
इरफान पठाणने पहिल्यांदाच दाखविला पत्नीचा चेहरा; लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट
naved-shaikh-shahrukh-khan
“जेव्हा शाहरुख सिगारेट काढायचा…” पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितला ‘ओम शांती ओम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या पान मसाला ब्रँडची नवीन जाहिरात प्रसारित झाली. ही जाहिरात बघून चाहत्यांना धक्का बसला. कारण अक्षयने मागच्या वर्षी पान मसाला ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. तसेच त्याने जाहिरातीतून काढता पाय घेतला होता. पण आता दीड वर्षांनी पुन्हा तो पान मसाला जाहिरातीत झळकला आहे.

“अक्षय कुमार म्हणाला होता की आता तो पान मसाल्याच्या जाहिराती करणार नाही कारण जेव्हा त्याने पहिल्यांदा विमलची जाहिरात केली होती, तेव्हा त्याचे चाहते खूप नाराज झाले होते. आता पुन्हा त्याने जाहिरात केली आहे,” असं नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘पैशांसाठी अक्षय कुमार काहीही करू शकतो’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘अक्षयचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने तो पुन्हा पानमसाल्याच्या जाहिराती करतोय’, असं आणखी एक युजर म्हणाला.

Akshay Kumar
व्हिडीओवरील कमेंट

जेव्हा अक्षय कुमारने मागितलेली माफी

“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही,” असं त्याने माफी मागत म्हटलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar in new pan masala ad with ajay devgn shah rukh after apologizing last year hrc

First published on: 09-10-2023 at 11:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×