अभिनेता अक्षय कुमार हा सध्या खूपच चर्चेत आहे. त्याला सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखलं जातं. ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात तो न दिसण्यामागचं कारण हे त्याने आकारलेलं मानधन आहे असं बोललं जात होतं. या चित्रपटासाठी त्याने ९० कोटींची मागणी केली होती. ही रक्कम ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण अक्षय कुमार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता नाही. तर या बाबतीत दक्षिणात्य अभिनेते आघाडीवर आहेत.

दक्षिणात्य सिनेसृष्टीने आता आपल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांमधून संपूर्ण जगात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. सध्या दाक्षिणात्य स्टार्स बॉलिवूड स्टार्सना टक्कर देताना दिसतात. केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर फीच्या बाबतीतही ते बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाहीत. काही दक्षिणात्य स्टार्सची फी बॉलीवूड स्टार्सपेक्षा जास्त आहे.

आणखी वाचा : “माझे अश्रू आणि यश…”, बालपणीचे फोटो शेअर करत जिनिलीया देशमुखची आईसाठी खास पोस्ट

या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे रजनीकांत. ते जगातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. रजनीकांत यांची आजही प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. आजही रजनीकांत तरुण कलाकारांना स्पर्धा देताना दिसतात. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार रजनीकांत यांनी २०२१ मध्ये आलेल्या ‘अन्नाथे’ चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतले होते. इतकंच नाही तर त्यांनू आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी १५० कोटी रुपये मानधन आकारले आहे.

हेही वाचा : क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत पाठोपाठ कमल हसन यांनी त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटासाठी १५० कोटी रुपये घेतले आहेत. तर प्रभासने ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’साठी १२० कोटी रुपये घेतले आहेत. तसंच अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’साठी १२० कोटी रुपये घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, राम चरणने आता त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतले आहेत. या त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव ‘आरसी १५’ नावाने येत आहे. हे दक्षिणात्य अभिनेते सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत टॉप ५ मध्ये येतात.