scorecardresearch

Premium

“मुली एवढ्या लवकर का मोठ्या होतात?”, लाडक्या लेकीसाठी अक्षय कुमारची भावुक पोस्ट, म्हणाला…

११ वर्षांच्या नितारासाठी अभिनेता अक्षय कुमारची खास पोस्ट, म्हणाला…

akshay kumar pens emotional note
अक्षय कुमारची लेकीसाठी पोस्ट…

अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्याबरोबरचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. २५ सप्टेंबरला अक्षयची मुलगी निताराचा ११ वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त लाडक्या लेकीला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न २’ केव्हा येणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर महाजनी म्हणाला…

11 year old boy created a mosaic art of Shree Ram
Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Ilaiyaraaja daughter Bhavatharini passes away
प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजांची मुलगी भवतारिणीचं निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
five lakh devotees visited the Ram temple
जय श्रीराम! पहिल्या दिवशी पाच लाख भाविक प्रभू रामाच्या चरणी लीन, अयोध्येत रामभक्तांचा मेळा

अक्षय कुमारने निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरचा खास व्हिडीओ शेअर केला होता. या पोस्टमध्ये अभिनेता लिहितो, “आपल्या मुली एवढ्या लवकर का मोठ्या होतात? हे मला कळत नाही. माझी लेक काही वर्षांपूर्वी माझा हात पकडून चालायला शिकली ती येत्या काही दिवसात मोठी होणार आहे. तिला संपूर्ण जग जिंकायचंय. मला तुझा आणि तुझ्यात असलेल्या कलागुणांचा खूप अभिमान वाटतो नितारा.”

हेही वाचा : हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून भारवले होते जॉनी लिवर, सेटवर नम्रता संभेरावला दिलेलं महागडं गिफ्ट; म्हणाली, “सोन्याचं…”

अक्षय पुढे लिहितो, “इतर मुलांना डिस्नेलॅंड पाहायला आवडतं पण, तुला स्वत:चं डिस्नेलॅंड बनवायचंय. तू अवकाशात उंच भरारी घेत राहा…मी आणि तुझी आई कायम तुझ्या पाठिशी आहोत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिन्सेस!”

हेही वाचा : “हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सुद्धा नितारासह एक गोड व्हिडीओ करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अक्षय आणि ट्विंकलने १७ जानेवारी २००१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २००२ मध्ये आरवचा आणि २०१२ मध्ये निताराचा जन्म झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar pens emotional note on daughter nitaras birthday sva 00

First published on: 26-09-2023 at 14:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×