बॉलीवूड कलाकारांबरोबरच त्यांचे बॉडीगार्ड्सदेखील चाहत्यांच्या चर्चेचे विषय असतात. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्या सावलीसारखा त्याच्याबरोबर असतो. याचप्रमाणे अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा व इतर अनेक सेलिब्रिटींच्या बॉडीगार्ड्सना तुम्ही पाहिलं असेल. या मोठ्या स्टार्सच्या बॉडीगार्ड्सना किती पगार मिळतो, याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते. अनेकदा त्यांना कोट्यवधी रुपये पगार असल्याची चर्चा होते; पण तसं खरंच आहे का, याचा खुलासा आलिया भट्ट, वरुण धवन आणि अनन्या पांडे यांच्यासह अनेक ए-लिस्टर्सना सुरक्षा पुरवणाऱ्या युसूफ इब्राहिमने केला आहे.

युसूफच्या मते, बऱ्याच बॉडीगार्ड्सना ते ज्यांच्यासाठी काम करतात, त्या कलाकारांबरोबरच ते काम करत असलेल्या चित्रपटाचे निर्माते आणि कार्यक्रमाचे आयोजकही पैसे देतात. अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या टॉप स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचीही हीच स्थिती आहे. या बॉडीगार्ड्सच्या पगाराचा विचार केल्यास जेवढी सोशल मीडियावर चर्चा होते, तेवढा तो नक्कीच नाही. “तुम्हाला त्यांचा पगार किती असेल असं वाटतं? त्यांचा पगार कदाचित २५ हजार ते एक लाख रुपये असू शकतो,” असं युसूफने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा – लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

पुढे युसूफ म्हणाला, “तसेच तुम्हाला किती पगारवाढ मिळते यावरही ते अवलंबून असतं. बॉडीगार्ड्सना महिन्याला पगार मिळतो, ते रोजंदारीवर नसतात. कोणीही बॉडीगार्ड्सना जास्त पैसे देत नाही. उद्या जर मी म्हटलं की मला दररोज १ लाख रुपये पगार मिळतो, तर मी ते अजिबात खरं नाही. खरं तर एवढा पगार मला कोणीही देणार नाही, कारण हे काम करण्यासाठी आणखी बरेच जण आहेत.”

हेही वाचा –बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

कोणत्या गोष्टींच्या आधारे ठरतात पगार?

सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सचे नेमके पगार किती असतात, याबाबत विचारल्यावर युसूफ म्हणाला, “मी सांगू शकत नाही. पण तुम्ही किती काळ संबंधित स्टारबरोबर काम करत आहात, इतक्या वर्षात तुमची किती पगारवाढ झाली आहे यावर ते अवलंबून आहे… पण तुम्ही म्हणता ते आकडे खोटे आहेत.”

हेही वाचा – ‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युसूफने सांगितलं की स्टार्स त्यांच्या बॉडीगार्ड्सच्या आरोग्याची काळजी घेतात. “एक स्टार तुम्हाला पगार म्हणून चांगली रक्कम देतो, ज्यामुळे तुम्ही तुमचे घर आरामात चालवू शकता. ते त्यांच्या मुलांच्या शाळेची फी, त्यांच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेतात. निदान मी ज्या लोकांबरोबर काम केलं आहे, ते आम्हाला वैद्यकीय मदतीची तसेच आमच्या मुलांची फी भरायची गरज असेल तेव्हा कळवायला सांगतात,” असं युसूफ इब्राहिमने नमूद केलं.