सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.आज अखेर हे दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. आता त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट हिने यांच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी या दोघांचं लग्न जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये धुमधडाक्यात पार पडलं. ५ तारखेला मेहंदी, ६ फेब्रुवारीला हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर काल दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी देखील त्यांच्या चाहत्यांना खूप वाट पहावी लागली. अखेर काल रात्री या दोघांच्या लग्नाचे फोटो आउट आहेत. हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर सर्व सेलिब्रेटींनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. तर आलिया भट्ट हिने देखील त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर करत एक खास कॅप्शन लिहिली.

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात एकत्र काम केलं. हा या दोघांचाही पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील आलिया आणि सिद्धार्थची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली. तर या चित्रपटानंतर काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होती. मात्र काही कारणाने त्यांना त्यांचे रस्ते वेगळे करावे लागले. त्यानंतर आलिया भट्ट रणबिर कपूर बरोबर रिलेशनशिप मध्ये आली आणि गेल्या वर्षी त्यांनी लग्न केलं. त्या पाठोपाठ आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेंड असलेला सिद्धार्थ मल्होत्राही विवाह बंधनात अडकला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत आलियाने लिहिलं, “तुम्हा दोघांचं खूप अभिनंदन..!” आता आलिया भट्टने शेअर केलेली ही स्टोरी चर्चेत आली आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी या पॅलेसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.