आलिया भट्ट व रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. १४ एप्रिल २०२२ला विवाहबंधनात अडकून रणबीर-आलियाने नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. शुक्रवारी रणबीर-आलियाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. लग्नाला एक वर्ष होताच आलियाने पती रणबीरचे काही अनसीन फोटो शेअर करत पोस्ट टाकली होती.
लग्नाला वाढदिवसाचं आलिया व रणबीरने खास सेलिब्रेशनही केलं. याचदरम्यान आलिया व रणबीरला स्पॉट करण्यात आलं. आलिया-रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया व रणबीर गाडीत बसलेले दिसत आहेत. पापाराझी आलिया-रणबीरचे फोटो क्लिक करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रणबीर पापाराझींशी हात मिळवत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
आलियाने या व्हिडीओमध्ये पापाराझींसमोरच रणबीरला किस केल्याचं दिसत आहे. आलिया-रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
आलिया-रणबीर लग्नाच्या काही महिन्यांनंतर आईबाबा झाले. नोव्हेंबर महिन्यात आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरने लाडक्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे.