सेलेस्टी बैरागे हुबेहुब आलिया भट्टसारखी दिसते. ती सोशल मीडियावर आलिया भट्टची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाते. टीव्ही शो ‘रज्जो’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती आलियासारखी दिसत असल्याने खूप व्हायरल झाली आणि तिला लोकप्रियताही मिळाली. ती आलिया भट्टशी तुलना केल्याने आनंदी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, ज्यामध्ये ती हुबेहुब आलियासारखी दिसत होती.

‘तो’ एक बोल्ड सीन अन् करिअरला लागली उतरती कळा, निर्मात्यांनी न विचारता केलेल्या कृत्याने संतापलेल्या अभिनेत्रीने…

आलियासारखं दिसण्याबाबत सेलेस्टीने प्रतिक्रिया दिली. “अभिनेत्री होण्यापूर्वी किंवा आताही मी आलियासारखी दिसते म्हणून फोटो टाकण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला नव्हता. जेव्हा लोक म्हणतात की मी माझ्या फोटोंमध्ये तिच्यासारखे हसण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला विचित्र वाटतं. मी तिच्यासारखी दिसते ही माझी चूक नाही. मी कधीही माझ्या फोटोंना आलियाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करणारे कॅप्शन दिलेले नाही, त्यामुळे काही वेळा लोक माझ्या पोस्टवर नकारात्मक कमेंट का करतात हे मला कळत नाही,” असं ती म्हणाली.

“कोकण खरंच स्वर्ग आहे, कारण…”, मराठी अभिनेत्रीने शेअर केला खड्ड्यांचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “सामाजिक प्रश्नावर…”

सेलेस्टी पुढे म्हणाली, “जेव्हा लोक म्हणतात की मी आलियासारखी दिसते, तेव्हा मला छान वाटतं कारण ती सुंदर आहे आणि माझी आवडती अभिनेत्री देखील आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्यासारखे दिसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. तिने तिचे करिअर ज्या प्रकारे मॅनेज केले आहे, ते पाहून मला प्रेरणा मिळते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपूर्वी आसाममधील एका छोट्या शहरातून मुंबईत स्थलांतरित झालेली ही अभिनेत्री मुंबईत एकटं राहणं सोपं नसल्याचं म्हणते. “या शहरात एकटं राहणं खूप कठीण आहे. माझ्यासाठी तो खूप मोठा बदल होता. पण रज्जोमध्‍ये काम मिळाल्यानंतर मला चांगले अनुभव आले. त्या मालिकेच्या सेटवर मला कौटुंबीक वातावरण मिळालं. मुंबई शहर खूप वेगळं आहे, सुरुवातीला वेळ लागला असला तरी आता या शहराशी जुळवून घेतल्यासारखे वाटते,” असं सेलेस्टी म्हणाली.