आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत आलियाने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. आलियाला तिला अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्ह डिसऑर्डर (ADHD) आणि एंग्झायटीची समस्या आहे. आता पुन्हा एकदा तिने याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच तिचा वाईट असेल तर ती काय करते हेही तिने सांगितलं.

आलिया भट्ट जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाली की तिचा वाईट दिवस असतो तेव्हा तिला बाल्कनीत उभं राहून इतर लोकांच्या घरांकडे पाहणं आवडतं. ती अशा भागात राहते जिथे सर्व इमारती एकमेकांच्या खूप जवळ आहेत, त्यामुळे ती बाल्कनीतून त्या इमारतींच्या खिडक्यांमधून आत डोकावून पाहते.

आलिया म्हणाली, “अनेकदा मी काय करते, खासकरून जेव्हा माझा दिवस वाईट असतो. माझ्या बेडरूमच्या मागे एक लहान बाल्कनी आहे आणि ती खूप लहान आहे, फायर एस्केपसारखी, मी तिथे जाऊन उभा राहते. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण माझ्या घराच्या आजूबाजूच्या इमारती एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने मी इतर लोकांच्या घरात खिडक्यांमधून पाहू शकते.”

हेही वाचा – मराठमोळ्या मकरंद देशपांडेंचे ‘हे’ गाजलेले चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

मी त्यांच्या बेडरूममध्ये डोकावत नाही- आलिया

आलिया म्हणाली, “मी तिथे जाऊन उभी राहते. मला वेगवेगळ्या लोकांच्या घरात घडत असलेल्या गोष्टी दिसतात. कोणी कपडे घालून घरात फिरत असतं, तर कुणी घरात टीव्ही पाहत असतं. मी त्यांच्या बेडरूममध्ये डोकावत नाही, पण त्यांच्या घरात पाहिल्याने मला जीवनाचं अस्तित्व मला जाणवतं.”

हेही वाचा – “छावामध्ये जखमांवर मीठ चोळताना…”, ‘कवी कलश’ साकारणाऱ्या अभिनेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “जी क्रूरता…”

आलिया पुढे म्हणाली की कोणत्याही व्यक्तीचं सर्वाधिक लक्ष स्वतःकडे असतं, त्यामुळे बाल्कनीतून ज्या गोष्टी मला दिसतात, त्यातून आयुष्याचा एक मोठा दृष्टीकोन पाहण्याची संधी मला मिळते. कारण आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करण्याची इतकी सवय होते की आपण हा क्षण माझा आहे, याचा विचार करत असता. पण जेव्हा तुम्ही तो विचार करणं थोड्या वेळासाठी सोडता तेव्हा सर्व काळजी, चिंता दूर होतात. फक्त एका सेकंदात तुम्ही आयुष्यात जिथे आहात याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतं, असं आलियाने नमूद केलं.

हेही वाचा – Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थकल्यावर रडते आलिया

आलिया याच मुलाखतीत पुढे म्हणाली की जेव्हा ती थकते तेव्हा खूप रडते. लहानपणीही ती असंच रडायची व आताही आलिया असंच रडते. “माझ्या लहानपणीही असंच व्हायचं. मी थकले की मी रडत असते. मी का रडत आहे हे मला समजत नाही. मग माझी आई म्हणते ‘डार्लिंग, तू थकली आहेस’ आणि मी म्हणते ‘सगळं अवघड आहे’. जेव्हा मी थकते तेव्हा असं होतं. मी अचानक कोणत्याही गोष्टीवर रडायला लागते,” असं आलिया म्हणाली.