अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबिर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला. रणवीर आणि आलियाची मुलगी राहा आता नऊ महिन्यांची आहे. डिलिव्हरीनंतर काही महिन्यातच आलियाने कामाला सुरुवात केली. तर आता ती घर आणि काम या दोन्ही गोष्टी कशा सांभाळते याचा खुलासा तिने केला आहे.

आलिया नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ती सोशल मीडियावरून चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांची संवाद साधला. यावेळी ती तिच्या पर्सनल आणि वर्कलाइफ बॅलन्सबद्दल बोलली.

आणखी वाचा : लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती माहितेय का? वाचून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं, “तुझ्या छोट्या मुलीला सांभाळणं आणि तुझं काम हे तू एकत्र कसं सांभाळतेस? मला हे करताना कधी कधी अपराधी वाटतं.” त्यावर उत्तर देत आलिया म्हणाली, “पालकत्व ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. मला नाही वाटत तुमच्याकडे प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नांची उत्तर असतील किंवा तुम्ही परफेक्ट असाल. माझा प्रत्येक दिवस मी गोष्टींवर प्रेम करत घालवेन याच प्रयत्नात मी असते. कारण या जगात प्रेमासारखी दुसरी गोष्ट नाही.” आलियाचं हे उत्तर आता खूप चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : Photos: मुलीच्या जन्मानंतर ‘अशी’ झाली आहे आलियाची अवस्था; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता रणवीर सिंहची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटातील आलियाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.