अभिनेत्री आलिया भट्ट ही आज भारतातील आघाडीची अभिनेत्री आहे. आज आलियाचा वाढदिवस आहे. स्टारकिड असल्याने तिला घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परंतु तिने स्वतःच्या कामाने स्वतःला सिद्ध करत ट्रोलर्सची बोलती बंद केली. आज तिचे जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. तिच्या कामाबरोबरच तिचं शिक्षण किती झालं आहे हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक असतात.

आलियाला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे तिला लहानपणापासून अभिनयाची आवड लागली. अभिनेत्री व्हायचं हे तिने लहान वयातच ठरवलं होतं. इतकंच नाही तर अभिनेत्री होण्यासाठी तिने तिचं शिक्षणही अर्धवट सोडलं. 

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

आणखी वाचा : “चित्रपट माझं पहिलं प्रेम पण…” राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टने करिअरबाबत घेतला मोठा निर्णय

जमनाबाई नरसी स्कूलमध्ये आलियाने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण आई-वाडिलांमुळे त्यांच्या घरात कलेचं वातावरण होतं. पण आलियाचा कल शिक्षणापेक्षा अभिनयाकडे जास्त होता. १० वी पूर्ण करून आलिया पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये गेली. परंतु आलियाचं शिक्षणात मन रमत नव्हतं. म्हणून आलियाने शिक्षण सोडलं. तिने १२वीची परीक्षाही दिली नाही. तेव्हाच शिक्षण थांबून अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं तिने ठरवलं. १०वी मध्ये असताना तिला ७१ टक्के मिळाले होते. इतके चांगले गूण मिळूनही तिने १२वी पूर्ण करायच्या आधीच शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

आज आलिया एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिल्यानंतर आता आलियाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. सध्या ती भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचं शूटिंग करत आहे. नुकतंच या चित्रपटाचं शेड्यूल काश्मीरमध्ये पार पडलं. तर लवकरच ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल अशी शक्यता आहे.