बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट एक नवी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. पोचर्स असं या सीरिजचं नाव आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रिची मेहता यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. आलिया भट्ट या सीरिजची कार्यकरी निर्मातीही आहे. तसंच या सीरिजच्या टिझरमध्येही ती एकदम हटके लुकमध्ये दिसते आहे.

पोचर्स या शब्दाचा अर्थ होतो शिकारी. अवैध शिकारींवर प्रकाश टाकणारी ही सीरिज असेल हेल या सीरिजचा दमदार टिझरच सांगतो आहे. पोचिंग म्हणजे बेकायदेशीररित्या केलेली शिकार आणि पोचर्स म्हणजे अवैध शिकारी. या प्रकरणावर प्रकाश टाकणारी ही वेबसीरिज आहे. यामध्ये एका लहान हत्तीची शिकार केली जाते ही घटना टिझरमध्ये दिसते आहे.

हे पण वाचा- रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशलची स्वाक्षरी पाहिली का? फोटो होतोय व्हायरल

वन अधिकाऱ्यांचा एक समूह जंगलात काहीतरी शोधतोय असं टिझरमध्ये दिसतं. त्यानंतर फ्रेममध्ये आपल्याला आलियाही दिसते. तिला कुठल्याश्या घटनेचा धक्का बसला आहे हे तिच्याकडे पाहून कळतं. तिचा लूक एकदमच हटके झाला आहे. अशोक का मर्डर सुबह ९ बजे रिपोर्ट हुआ. इस महिने का ये तिसरा हादसा. मर्डर इज मर्डर. असा संवादही आलियाच्या नॅरेशनमध्ये ऐकू येतो आणि समोर एक आकृती दिसते. छोटासाच टिझर पण प्रभावशाली झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सीरिजबाबत आलियाने सांगितलं की हा व्हिडीओ शूट करण्यासाठी मी जंगलात एक दिवसापेक्षा कमी वेळ घालवला. पण इतक्या कमी कालावधीतही मी घाबरले होते. मर्डर हा मर्डरच असतो.. पोचर्स दिग्दर्शित करणाऱ्या रिची मेहताने दिल्ली क्राईम ही सीरिजही दिग्दर्शित केली होती. २३ फेब्रुवारीपासून ही सीरिज स्ट्रीम होणार आहे.