आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर दोन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता काही महिने कामातून ब्रेक घेत ती पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. पण अशातच तिच्या घरातला एक सदस्य तिच्यावर नाराज आहे. हा सदस्य म्हणजे आलियाची मांजर एडवर्ड.

राहाच्या जन्मानंतर काही दिवसातच आलिया भट्टने तिचं रुटीन बदललं. आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी तिने योगा ही करायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना ती मुलीकडेही तितकंच लक्ष देत आहे. राहाच्या येण्याने तिच्या आयुष्यात बरेच बदल झाल्याचं तिने नुकतंच एक पोस्ट शेअर करत सांगितलं. पण तिच्या या वागण्यामुळे तिची पाळीव मांजर तिच्याकडे दुर्लक्ष करू लागली आहे, असं तिच्या चाहत्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : “मातृत्वाने मला खूप बदललं…,” आलिया भट्टने सांगितला अनुभव

आलिया भट्टने नुकताच तिच्या मांजरीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.या फोटोमध्ये आलियाची मांजर एडवर्ड ही अजिबात आलियाकडे बघत नाहीये. तिचं लक्ष दुसरीकडेच आहे. हा फोटो शेअर करताना आलियाने तिच्या मांजरीने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितलं. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “गरोदर होती ना…” लग्नातील व्हायरल फोटोवर खोचक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी केलं आलिया भट्टला ट्रोल

या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या. “आता तू राहायला जास्त वेळ देतेस एडवर्ड कडे लक्ष देत नाहीस म्हणून ती तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे,” असं एका नेटकऱ्याने लिहिलं. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तू तिलाही वेळ द्यावा अशी तिची अपेक्षा आहे.” आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.