अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सध्या सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अनेकांनी आलिया-रणबीरच्या पहिल्या बाळाचं स्वागत केले आहे. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. लेकीच्या जन्मानंतर आता आलिया ही सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. नुकतंच तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टने ६ नोव्हेंबर रोजी बाळाला जन्म दिला. तिच्या बाळाच्या जन्मानंतर गुडन्यूज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने सिंहाच्या कळपाचा फोटोही शेअर केला होता. त्याबरोबर तिने त्याला कॅप्शनही दिले होते. “आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर”, असे तिने म्हटले होते.
आणखी वाचा : मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष

यानंतर आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. आलियाने इन्स्टाग्रामवर तिच्या कॉफी मगचा फोटो पोस्ट केला आहे. यावर ‘मम्मा’ असे लिहिले आहे. यात ती तो कॉफीचा मग हातात धरुन बसल्याचे दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नाही. आलियाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिने ‘ही मी’ असे म्हटले आहे. आलियाची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : “बाळ जन्माला येते तेव्हा…” आलिया भट्टच्या प्रसूतीनंतर आईचा लेकीला खास सल्ला

आलियाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफने तिच्या या फोटोवर ‘क्यूट’ अशी कमेंट केली आहे. तर आलियाची आई सोनी राजदान यांनी ‘बेबी’ अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला दुपारी १२ ते १२.३० वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.