बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच नात नेहमीच चर्चेत असतं. ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांची सून असली तरी त्यांच्यात मैत्रीच नात जास्त आहे. त्यांच्यातील हे खास नात अनेकदा मीडियासमोर दिसूनही आलं आहे. मात्र, एकदा ऐश्वर्याच्या वागण्यावर नाराज होत अमिताभ बच्चन यांना तिला मीडियासमोर ओरडले होते. काय आहे तो किस्सा घ्या जाणून
हेही वाचा- सलमान खानच्या चित्रपटांच्या सेटवर मुलींसाठी आहे ‘हा’ विशेष नियम; पलक तिवारीने केला खुलासा
एका कार्यक्रमादरम्यान मीडियासमोर अमिताभ बच्चन मुलाखत देत होते. तेवढ्यात ऐश्वर्या ओरडत तिथे येते आणि अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेते आणि म्हणते ‘हे बेस्ट आहेत’. ऐश्वर्याच्या या वागणूकीनंतर अमिताभ बच्चन थोडे नाराज झाले आणि ते प्रेमाने ऐश्वर्याला ओरडत म्हणतात ‘आराध्यासारखं वागण बंद कर’. मात्र, काही वेळानंतर अमिताभ बच्चन हसतात. मात्र, ऐश्वर्या यानंतरही शांत बसत नाही. आणि म्हणते ‘मी इथे हे करु शकते’.
हेही वाचा- सलमान खानच्या नव्या बुलेटप्रूफ कारच्या नंबर प्लेटमागे नेमकं दडलंय काय?
ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं. २०११ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचा जन्म झाला. आराध्या नेहमी आपली आई ऐश्वर्याबरोबर अनेक ठिकाणी दिसत असते. नुकतीच नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्धाटन कार्यकम्रात ऐश्वर्याबरोबर दिसली होती.