बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी प्रोजेक्ट के या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि चित्रीकरणासह इतर कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अमिताभ बच्चन हे सध्या विश्रांती घेताना दिसत आहेत. अमिताभ यांची प्रकृती ठीक होण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी मी सध्या विश्रांती घेत आहे. लवकरच पूर्णपणे बरा होईन, असे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे एका फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करताना दिसले होते. त्यानंतर आता नुकतंच ते पुन्हा शूटींग कधी सुरु करणार याबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत, केबीसीच्या शूटींगदरम्यान पायाची नस कापली

अमिताभ बच्चन यांच्या एका जवळच्या मित्राने ई-टाईम्सशी बोलताना याबद्दलची अपडेट दिली. “बिग बींना लवकरच पुन्हा शूटींग सुरु करण्याची इच्छा आहे. पण वयामुळे त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती ठिक होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो”, असे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले.

कधी झालेली दुखापत?

गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन हे हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत होते. त्यावेळी ते जखमी झाले. त्यांच्या बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. त्यानंतर एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते आराम करत आहेत.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी दुखापत होण्यापूर्वी रिभू दासगुप्ता यांचा ‘सेक्शन 84’ या चित्रपटासाठी होकार दिला होता. या चित्रपटात निमृत कौर झळकणार आहे. त्याबरोबरच ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’ आणि ‘बटरफ्लाय’ या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन झळकणार आहेत.