अमिताभ बच्चन यांच्यासारखा महानायक हा शतकातून एकदा होतो. आजही अमिताभ बच्चन हे तितक्याच उत्साहाने आणि हिरीरीने काम करतात. अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळात सुपरस्टार राजेश खन्नाबरोबरच्या ‘आनंद’ चित्रपटाने अमिताभ यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर कालांतराने अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता वाढली आणि राजेश खन्नाची जागा त्यांनी हळूहळू घ्यायला सुरुवात केली. असाच एक किस्सा अमिताभ बच्चन यांच्या बाबतीतही घडला होता.

अमिताभ यांनी साऊथचा सुपरस्टार कमल हासनबरोबर एक चित्रपट करताना तो चित्रपट मध्येच सोडून दिला होता. याला कारणीभूत होता तो म्हणजे कमल हासन यांचा तगडा अभिनय. अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांनी ‘गिरफ्तार’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. १९८५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. प्रयागराज दिग्दर्शित, या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याशिवाय माधवी आणि पूनम धिल्लन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात रजनीकांतचीही विशेष भूमिका आहे. पण, या चित्रपटापूर्वीच अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांनी एका साऊथ निर्मात्याच्या चित्रपटासाठी एकत्र शूट केले होते. मात्र, हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.

आणखी वाचा : शाहरुख खान आहे ५९०० कोटींचा मालक; अभिनयाशिवाय ‘या’ सहा मार्गांनी कमावतो करोडो रुपये

नुकतंच यामागील कारण समोर आलं आहे. ‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार निर्माते के भाग्यराज यांनी नुकताच एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार अमिताभ बच्चन यांना कमल हासन यांच्या अभिनयामुळे असुरक्षित वाटायला लागलं होतं त्यामुळेच त्यांनी तो चित्रपट अर्धवट सोडून दिला. चित्रपटाचं दिग्दर्शन रामानाथन करणार होते अन् याचं नाव होतं ‘खबरदार’.

आणखी वाचा : मनोज बाजपेयींनी केले अमृता सुभाषचे तोंडभरून कौतुक; उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देत म्हणाले, “तिची जिद्द…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात कमल हासन यांची एका आजारी व्यक्तीची भूमिका होती तर अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी कमल हासनच्या पात्राचा मृत्यू होतो आणि इथेच कमल यांचं पात्र अधिक वरचढ होताना पाहून अमिताभ यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला होता. असं म्हंटलं जातं की हा अमिताभ यांच्या कारकीर्दीतील पहिला तमिळ चित्रपट होता. एकंदरच कमल हासन यांचा अभिनय आणि त्यांना मिळणारी लोकप्रियता पाहून अमिताभ यांनी हा चित्रपट अर्धवट सोडून दिला. पुढे मात्र हे दोन दिग्गज कलाकार कोणत्याच चित्रपटात एकत्र आले नाहीत.