मागच्या काही काळापासून बॉलिवूड चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. मोठ-मोठ्या स्टार कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले आहेत. ज्यात अमिताभ बच्चन यांच्या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ या चित्रपटाचाही समावेश आहे. अशात लवकरच त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना हात जोडून विनंती केली आहे. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून या चित्रपटात अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणिती चोप्रा, नफीसा अली आणि डॅनी डेंजोंगप्पा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

अमिताभ बच्चन सध्या क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती १४’चं होस्टिंग करत आहे. नुकतीच या शोमध्ये अनुपम खेर, बोमन ईरानी आणि नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना हात जोडून विनंती केली आहे. आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करताना त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

आणखी वाचा- “वडिलांना जातीच्या…”; अमिताभ यांनी सांगितला ‘बच्चन’ आडनावामागचा किस्सा

अमिताभ बच्चन म्हणाले, “चित्रपटगृहात जाऊन, तिकिट विकत घेऊन चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते. कृपया आमचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जा. सध्या कोणी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीये. हात जोडून विनंती आहे की, कृपया तिकिट काढून चित्रपट पाहा.” अशाप्रकारे विनंती करून अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- KBC 14: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लग्नानंतरची खास आठवण; म्हणाले, “सुरुवातीच्या काही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटाचा ट्रेलर मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी केलं आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते ‘प्रोजेक्ट के’मध्ये दिसणार आहेत. तसेच या वर्षांत त्यांचे ‘झुंड’, ‘रनवे ३४’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘गुडबॉय’ हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील ‘ब्रह्मास्त्र’ वगळता इतर सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे आता ‘ऊंचाई’कडून अमिताभ बच्चन यांना फार अपेक्षा आहेत.