ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या १५ व्या पर्वाचे होस्ट आहेत. ते या शोमध्ये स्पर्धकांशी गप्पा मारताना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासे करत असतात. एका ताज्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या मनात अभिनयाचं बीज रोवणाऱ्या व्यक्तीबद्दल खुलासा केला आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्यांचे धाकटे भाऊ अजिताभ होय.

“एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?” ‘तो’ फोटो शेअर करत केतकी चितळेची पोस्ट; म्हणाली, “चुकून तो…”

बिग बी भाऊ अजिताभ यांच्याबद्दल म्हणाले, “पाहा, कोणत्याही भावा-बहिणीच्या नात्यात किंवा दोन भावांच्या नात्यात जो लहान असतो, त्याच्यासाठी सर्व मोठे भावंड सुरक्षित वातावरण तयार करतात. त्याची काळजी घेतात.” अमिताभ यांनी पुढे सांगितलं की त्यांच्यात व त्यांच्या लहान भावात ५-६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे आपल्या धाकट्या भावंडाचे रक्षण करण्याच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला नेहमीच होती, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे धाकटे भाऊ अजिताभ यांनीच अमिताभ यांच्या सिनेसृष्टीत प्रवेश करण्याच्या निर्णयात मोठी भूमिका बजावली होती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

अजिताभ यांनी बिग बींना तुम्ही चित्रपटांमध्ये जायला हवं, असं सांगितलं होतं. अमिताभ म्हणाले, “आम्ही कोलकात्यात नोकरी करत होतो. त्याने माझा फोटो काढला आणि एका स्पर्धेत पाठवला. पण त्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली नाही. मात्र अजिताभने माझ्या मनात या क्षेत्रात येण्याचा विचार रुजवला. त्यानंतर मी कोलकात्यातील नोकरी सोडली होती.”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते एक उद्योजक आहेत आणि आपल्या कुटुंबाबरोबर लंडनमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव रमोला आहे. रमोला या अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीण होत्या. अजिताभ व रमोला यांना तीन अपत्ये आहेत.