बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही महिन्यांपूर्वी ते आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली. त्या दिवसापासून ते दोघेही खूप चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. काही दिवसांपूर्वी आलियाच्या प्रसूतीची तारीख समोर आली होती. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यापूर्वीच आलिया भट्ट ही रुग्णालयात दाखल झाली आणि ६ नोव्हेंबर रोजी तिने गोड बातमी दिली.

आलियाने गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया भट्टने दिलेल्या या बातमीने भट्ट आणि कपूर कुटुंबियांबरोबरच तिचे चाहतेही अत्यंत खुश झाले आहेत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. आलियानेसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. बॉलिवूडमध्ये सगळेच ही बातमी ऐकून खुश आहेत आणि आलिया-रणबीरला शुभेच्छा देत आहेत.

आणखी वाचा : शांत डेंटिस्टचा क्षणार्धात होणाऱ्या सिरियल किलरची मिस्ट्री उलगडणार, कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित ‘फ्रेडी’चा टीझर प्रदर्शित

याप्रमाणेच आनंदाच्या क्षणात सहभागी होणाऱ्या अमूल ब्रँडनेसुद्धा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. एखादी कोणतीही मोठी घटना घडली की अमूल त्यासंदर्भात एक छानसं कार्टून त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर करतं. असंच एक खास कार्टून अमूलने शेअर केलं आहे. त्यात रणबीर, आलिया आणि त्यांचं बाळ आणि बरोबरच आलियाने जे सोशल मिडीयावर पोस्ट केली होती त्यातला एक फोटो यात आपल्याला पाहायला मिळतो. हे पोस्टर शेअर करत अमूलने लिहिलं, “स्टार जोडप्याच्या पोटी एका गोड कन्यारत्नाने जन्म घेतला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Amul – The Taste of India (@amul_india)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा आहे. लोकांनी या पोस्टरला आजवरचं सगळ्यात सुंदर पोस्टर असंही म्हंटलं आहे. आलिया भट्ट ही २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यापूर्वीच तिने बाळाला जन्म दिला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती.