Ananya Panday & Chunky Panday Dance Video : बॉलीवूड मनोरंजन सृष्टीत महत्त्वाचा समजला जाणारा ‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळा १७ मे रोजी मुंबईत पार पडला. यंदा या कार्यक्रमाला कार्तिक आर्यन, तमन्ना भाटिया, राशा थडानी, अनन्या पांडे, क्रिती सेनॉन, रश्मिका मंदाना, विवेक ओबेरॉय असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यातील Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळ्यात राशा थडानी, अनन्या पांडे, रश्मिका मंदाना, तमन्ना या अभिनेत्रींनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर केले आहेत. अनन्या पांडे या सोहळ्यात तिचे वडील चंकी पांडे यांच्या काही आयकॉनिक गाण्यांवर थिरकली.

१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाप की दुनिया’ या सिनेमात अनन्याचे वडील व अभिनेते चंकी पांडे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘पाप की दुनिया’ या सिनेमातील चंकी पांडे यांचं ‘मैं तेरा तोता’ हे गाणं सर्वत्र सुपरहिट झालं होतं. या गाण्यात चंकी पांडे यांच्याबरोबर अभिनेत्री नीलम झळकली होती. वडिलांच्या याच सुपरहिट गाण्यावर अनन्याने जबरदस्त डान्स केला आहे.

लेक अनन्या ‘मैं तेरा तोता’ या गाण्यावर डान्स करत असताना चंकी पांडे यांनी स्टेजवर एन्ट्री घेतली. यानंतर हे बापलेक एकत्र जबरदस्त डान्स करताना दिसले. अनन्या आणि चंकी पांडे यांना रंगमंचावर एकत्र डान्स करताना पाहून अन्य कलाकारांसह उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सध्या या बापलेकीच्या जबरदस्त डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, अनन्या व चंकी पांडे यांना एकत्र डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “स्टेजवर कोणतेही कलाकार नव्हे तर एक बाबा आणि त्यांची मुलगी डान्स करतेय असंच वाटतंय”, “चंकी पांडेंची कमाल एनर्जी आहे”, “बेस्ट – बापलेकीची जोडी”, “दोघांनी अप्रतिम डान्स केलाय”, “वॉव हा आजचा बेस्ट व्हिडीओ आहे” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.