काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या कानावर पडत आहेत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र बघण्यात आले होते. यावरुन अनन्या आणि आदित्य रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता या चर्चांवर अनन्या पांडेने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत अनन्या पांडेने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- “मला रणबीरला थप्पड मारायची होती”; अभिनेत्याच्या त्रासाने हैराण झाली होती अनुष्का शर्मा, रडत म्हणालेली…

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनन्या पांडेने तिच्या लग्नाच्या योजनांबद्दल खुलासा केला आहे. अनन्या म्हणाली, “मी लग्नासाठी अजून खूप लहान आहे. त्यामुळे माझा लग्नाबाबत कोणताही प्लॅन नाही.” अनन्या आणि आदित्य लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अनन्याच्या या खुलाश्यानंतर या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा- “ती माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते”; नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिल्यावरुन कंगना राणौतवर आलिया भडकली, म्हणाली…

आदित्य आणि अनन्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत आहेत. सिद्धार्थ कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीशिवाय, हे दोघं क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीतही दिसले होते. अंगद बेदी आणि नेहा धुपियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला होता. दरम्यान, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केलेलं नाही.

हेही वाचा- कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या सध्या दिल्लीत तिच्या आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करत आहे. ती लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीमगर्ल २’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदीबरोबर ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात झळकणार आहे.