एका पत्रकाराला अचानक १ दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळते आणि तो त्या एका दिवसात अचाट काम करून जातो. तुम्हाला कळेलच असेल तो कोणता चित्रपट, अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे ‘नायक’, या चित्रपटाने अनिल कपूर यांना वेगळी ओळख मिळवून दिली. २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला, खरं तर हा चित्रपट अनिल कपूर यांना चित्रपटासाठी विचारलेच नव्हते.

अनिल कपूर यांचा आज वाढदिवस, गेली अनेकवर्ष ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आजवर त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या मात्र नायक हा आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहणार चित्रपट आहे. चित्रपटाला जेव्हा २० वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा अनिल कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात ते असं म्हणाले की “या चित्रपटासाठी पहिल्यांदा आमिरला विचारले मात्र दिग्दर्शक आणि त्याच्यात संवाद होऊ शकला नाही त्याने नकार दिला मग शाहरुखला विचारले मात्र तो ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत होता. म्हणून त्याने नकार दिला, म्हणून ही भूमिका माझ्याकडे आली,” असे अनिल कपूर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अमरीश पुरी आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते, राणी मुखर्जी या चित्रपटात अनिल कपूरच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली होती. ‘नायक’ मूळ तामिळ चित्रपट ‘मुधवलन’चा रिमेक आहे. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.