बॉलिवूडमध्ये अनिल कपूर यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. कित्येक तरुणांना लाजवेल असा अनिल कपूर यांचा फिटनेस आहे आणि त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळेच आजही त्यांना चित्रपटात मुख्य भूमिका मिळतात. या वयातही केवळ चरित्र अभिनेता म्हणून एका चौकटीत न अडकता अनिल कपूर यांनी व्यावसायिक चित्रपट आणि समांतर चित्रपट यांच्यात अगदी योग्य समतोल साधला आहे. हे जरी असलं तरी एकेकाळी बॉलिवूडच्या महान दिग्दर्शकाने त्यांना एका सल्ला दिला होता.
ऐंशीच्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अनिल कपूरच्या बरोबरीने तेव्हा जॅकी श्रॉफ, संजय दत्त ही मंडळी होती. अनिल कपूर यांचे वो सात दिन, मशालसारखे चित्रपट येत होते. त्यांना बॉलिवूडचे महान दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या बरोबर काम करायची इच्छा होती. अनुपम खेर यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला होता. ते असं म्हणाले की “मनमोहन देसाईंबरोबर मला काम करायचे होते कारण त्यांनी अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. तुम्हाला व्यावसायिक चित्रपट करायचा असेल तर तुम्हाला मनोहन देसाईंबरोबर काम करायला पाहिजे, मात्र मनमोहन देसाई मला म्हणाले की, मिशी असलेले अभिनेते स्टार होऊ शकत नाहीत, त्यांनी मला सांगितले की तू उत्तम अभिनेता आहेस मात्र तू स्टार होऊ शकत नाहीस, यावर मी नाराज झालो होतो.” अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती.
उंचीमुळे बिग बींना शाळेत करावा सहन करावा लागलेला त्रास; आठवण सांगत म्हणाले, “माझे सिनियर्स…”
अनिल कपूर नुकतेच थार’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड’मध्ये नामांकन मिळालं आहे. अनिल कपूर यांनाही या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी नामांकन मिळालं आहे.
अनिल कपूर मूळचे मुंबईचे गेली अनेकवर्ष ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीयदेखील याच क्षेत्रात आहे. भाऊ संजय कपूर अभिनेते आहे तर बोनी कपूर हे निर्माते आहेत. अनिल कपूर यांना दोन मुलं असून ही दोन्ही मुले चित्रपटात काम करत आहेत.