अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचं २ मे रोजी निधन झालं. अनिल कपूर यांच्या आई निर्मला कपूर यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. निर्मला यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. निर्मला यांना बोनी कपूर, अनिल कपूर, संजय कपूर ही तीन मुलं, तर रीना कपूर (मुलगी) अशी एकूण चार मुलं आहेत. आईच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब अंतिमविधीसाठी एकत्र आलं. तर आजीच्या निधनाची बातमी कळताच परदेशात असलेली अभिनेत्री सोनम कपूरही त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी त्वरित भारतात आली.

अशातच आता कपूर कुटुंब हळू हळू या दु:खातून सावरत आहे. बोनी कपूर, अनिल कपूर, संजय कपूर त्यांच्या पत्नी व मुलं सोशल मीडियामार्फत आई, आजीसाठी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील त्यांच्या आईच्या निधनानंतर सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या आईचं चित्र रेखाटलेलं पेंटिग पाहायला मिळतं, तर यासह त्यांनी आईबरोबरचा लहानपणीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये कपूर कुटुंबाचा एकत्रित फोटोही पाहायला मिळतोय.

अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोखाली त्यांनी आईच्या आठवणीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आईने कायम आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. तिने कायम स्वत:च्या आधी इतरांचा विचार केला. कायम सगळ्यांवर प्रेम केलं. स्पॉटलाईटपासून दूर असूनही कायम सगळ्यांबरोबर तिचे खूप चांगले संबंध होते,” असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी इंडस्ट्रीतून त्यांना या काळात मिळालेल्या आधारासाठी सर्वांचे आभार मानले आहेत. अनिल यांनी शेअर केलेल्या या फोटोखाली त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी त्यांच्याशी सहमत होत कमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कपूर कुटुंब सध्या निर्मला कपूर यांच्या निधनाच्या दुखा:तून जात आहे. यावेळी या कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना आधार देत आहेत. अनिल कपूर यांच्यासह शनाया कपूर, अनशुला कपूर यांनीदेखील त्यांच्या आजीच्या आठवणी शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.