रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस बक्कळ कमाई करताना दिसत आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये अभिनेता बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉबीचे डायलॉग फारसे नसले तरी त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो भावुक होऊन ढसाढसा रडताना दिसत आहे.

अभिनेता बॉबी देओलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. यादरम्यान चाहते आणि पापाराझी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्याच्या कामाच कौतुक करताना दिसत आहेत. हेच पाहून बॉबी देओल म्हणतो, “ये क्या बात है. मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. चित्रपटाला लोकांचं इतकं प्रेम मिळतं आहे. हे पाहून मला असं वाटतं की, मी स्वप्नचं पाहत आहे.” यानंतर अभिनेता रडताना दिसत आहे. त्यांची टीम त्याला सावरताना पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून बॉबी देओल भावुक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केले शेवटचे खास क्षण

बॉबीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊल पडत आहे. एका नेटकरीने लिहिलं आहे, “२०२३ हे देओल कुटुंबासाठी सर्वोत्कृष्ट होते. धर्मेंद्र यांचा चित्रपट आला. सनीचा ‘गदर २’ सुपरहिट झाला. करणचं लग्न झालं. सनीचा छोटा मुलगा राजबीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले. बॉबीचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट हिट झाला. याचाच अर्थ देओल कुटुंबातील सदस्यांसाठी ही उत्तम कामगिरी आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “हे यशाचे अश्रू आहेत.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “चित्रपटात तू रणबीरला खाऊ टाकलास.”

हेही वाचा – CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका; ५७ वर्षीय दिनेश फडणीस यांची व्हेंटिलेटरवर सुरू आहे मृत्यूशी झुंज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशी ‘जवान’ चित्रपटाला मागे टाकतं ६६ कोटींची कमाई केली. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ६३ कोटींचा गल्ला जमवला होता. सध्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरू आहे.