Animal vs Sam Bahadur Box Office Collection day 9: ‘सॅम बहादुर’ आणि ‘अ‍ॅनिमल’ हे दोन बहुचर्चित चित्रपट १ डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर घोडदौड अद्याप कायम आहे. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याने ‘सॅम बहादुर’ला फटका बसला मात्र तो अजूनही थिएटर्समध्ये टिकून आहे. दुसरीकडे ‘अ‍ॅनिमल’ची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाचे बजेट ५५ कोटी रुपये आहे. तर, रणबीर कपूर व रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’चे बजेट १०० कोटी रुपये आहे. ‘अ‍ॅनिमल’ हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट असून याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. तर ‘सॅम बहादुर’ हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा बायोपिक असून याचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे.

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”

कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची कमाई

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६३ कोटींची कमाई केली होती. नऊ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, ‘अ‍ॅनिमल’ने नवव्या दिवशी तब्बल ३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३९८.५३ कोटींवर पोहोचले आहे. यासह हा चित्रपट आता ४०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून फक्त दीड कोटी रुपये दूर आहे.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

‘सॅम बहादुर’ची कमाई

‘सॅम बहादुर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली होती. विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या ८ दिवसांत ४२.३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता नवव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सॅम बहादुर’ ने दुसऱ्या शनिवारी ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई आता ४९.५ कोटींवर पोहोचली आहे.

Story img Loader