Aishwarya Rai -Abhishek Bachchan Photo: मागील काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत आहे. दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसून त्यांनी ‘ग्रे डिव्हॉर्स’ घेतला आहे, असंही म्हटलं जात आहे. अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नेहमी ऐश्वर्या व अभिषेक एकाच इव्हेंटला वेगवेगळे येतात; त्यामुळे या चर्चांनी जोर धरला होता. अखेर या दोघांचा एक फोटो समोर आला आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक व ऐश्वर्या वेगवेगळे पोहोचले होते. अभिषेक त्याचे आई-वडील व बहिणीच्या कुटुंबाबरोबर आला होता. तर, त्याच ठिकाणी ऐश्वर्या राय काही वेळाने लेक आराध्याबरोबर आली होती. त्यानंतर अनेकदा एका अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्याबरोबर फक्त आराध्या दिसली होती. दोघांनी एकमेकांच्या वाढदिवसाला पोस्टदेखील केल्या नव्हत्या. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा जास्तच रंगली.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

आता प्रसिद्ध निर्माते शशी रंजन यांची पत्नी अनु रंजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्याबरोबर ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन दिसत आहेत. ऐश्वर्याने घेतलेला एक सेल्फी अनुने शेअर केला आहे. यात ऐश्वर्या राय, तिची आई वृंदा राय, अभिषेक बच्चन व अनु असे चार जण दिसत आहेत. सर्वजण हसून या फोटोत पोज देताना दिसत आहेत. ‘खूप सारं प्रेम’ असं कॅप्शन देत अनुने हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा – “एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…

पाहा फोटो –

View this post on Instagram

A post shared by Anu Ranjan (@anuranjan1010)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनु रंजनची पोस्ट पाहून चाहते खूश झाले आहेत. अनेकांनी अनुचे आभार मानले आहेत. गेले अनेक महिने ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. यातच अनुने ही पोस्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.