अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला Ra.One हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहरुख खानने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, पण नंतर मात्र काही लोकांना हा चित्रपट आवडला होता. हा काळाच्या पुढे असलेला चित्रपट आहे, असं लोकांनी म्हटलं होतं.

काही लोकांना या सिनेमाची संकल्पना, स्टोरी टेलिंग आणि पटकथा लेखन फार आवडलं होतं. पण, या चित्रपटाबाबत अनेक वादही झाले होते. त्यातील अनेक दृश्ये लोकांना खटकली होती. त्यापैकी एका दृश्यात शाहरुख खानने साकारलेल्या पात्राचे निधन दाखवण्यात आले होते. या दृश्यावरून निर्मात्यांवर टीका झाली होती. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अनेक वर्षांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे, त्याची एक छोटी क्लिप आता व्हायरल होत आहे.

अनुभव सिन्हा यांनी IC 814 च्या वादादरम्यान द लल्लनटॉपला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या सीरिजसंदर्भातील वादावर स्पष्टीकरण दिलं होतं. त्याचवेळी त्यांना Ra.One चित्रपटातील वादग्रस्त दृश्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. दे दृश्य शाहरुख खानने साकारलेल्या पात्राच्या मृत्यूचे होते. या मुलाखतीची एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अनुभव सिन्हा म्हणतात, “मी हा चित्रपट शूट केला आहे म्हणून मला ते सगळं चांगलंच आठवतंय. जेव्हा लंडनमध्ये एखादा माणूस मरतो तेव्हा त्याचे शरीर तिरडीवर ठेवून नेले जात नाही, म्हणूनच मी त्याचा मृतदेह कॉफिन (शवपेटीत) ठेवला होता.”

पुढे अनुभव सिन्हा म्हणतात, “त्या कॉफिनमुळे तुम्हाला वाटलं की पार्थिव दफन केले. पण काही वेळा दिग्दर्शकावर शंका उपस्थित करण्याऐवजी लोकांनी स्वतःवर शंका उपस्थित करायला हवी, कारण मी इतका मूर्ख तरी नाहीच. समजा पार्थिव दफन केले, तर त्याचे अस्थी विसर्जन दाखवतोय तर ती चूक नक्कीच नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Ra.One मधील शाहरुख खानच्या मृत्यूचा सीन काय होता?

अनुभव सिन्हा यांचा चित्रपट Ra.One मध्ये शाहरुख खानच्या त्या वादग्रस्त सीनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा पार्थिव कॉफिनमध्ये ठेवलं जातं. त्यानंतर करीना कपूर त्याचे अस्थी विसर्जन करते असंही दाखवण्यात आलं होतं. Ra.One चे पार्थिव कॉफिनमध्ये ठेवल्याने त्याला दफन केलं असावं असं लोकांना वाटतं, पण करीनाला अस्थी विसर्जन करताना पाहून लोकांनी या विरोधाभासाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. यावर बराच वाद झाला होता. कारण या सिनेमात शाहरुखने साकारलेले पात्र तमिळ ब्राह्मणचे होते, त्यामुळे ब्राह्मणाला दफन कसे करण्यात आले आणि जर दफन केले तर अस्थी विसर्जन कसे केले, असे प्रश्न लोकांनी विचारले होते.