अनुपम खेर बॉलिवूडमधल्या अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच त्यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे कलाकार दिसणार आहेत. राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजातिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चार जिवलग मित्रांची कथा सांगणारा हा चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे.

अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यावर ते सतत काही ना काही पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनेकदा त्यांच्या आई, दुलारी खेर दिसतात. अनुपम यांनी खास त्यांच्यासाठी काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांच्या ‘मंजिले और भी है” या नव्या टॉकशोची नुकतीच सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये दुलारी खेर यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी अनुपम यांच्या बालपणातला एक गमतीदार किस्सा सांगितला.

आणखी वाचा – लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? प्रसूतीच्या तारखेवरुन चर्चांना उधाण

या किस्स्याची सुरुवात करताना अनुपम म्हणाले, “शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये भरायचे पैसे मला तिने (दुलारी खेर) दिले होते. पण ते पैसे मी स्वत:कडे ठेवले. नंतर तिला माझ्या दप्तरामध्ये त्यातले काही पैसे सापडले. त्यांना मध्येच थांबवत दुलारी म्हणाल्या, “तेव्हा तुझे बाबा मला जाऊ देत, लहान आहे तो असे म्हणत होते. पण मला ते पटलं नाही. चोरी केल्यावर मार पडणार हे नक्की होतं.” पुढे अनुपम म्हणाले, हा तेव्हा मी खूप मार खाल्ला होता आणि मला कपडे काढून घराबाहेर उभं केलं होतंस. त्यावर दुलारी पटकन “तर तर मारायला नको होत का?” असे म्हणाल्या.

आणखी वाचा – “बॉलिवूडमध्ये राष्ट्रविरोधी गँग…”; कंगना रणौतचे टीकास्त्र, आमिर खानच्या नावाचाही केला उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी आणि माझ्या छोट्या भावाने, राजूने आईचा खूप मार खाल्ला आहे. लहाणपणी ती आम्हाला एका झाडाच्या काठीने मारायची. एकदा त्या झाडामधील विषारी पदार्थांच्या स्पर्शाने मी आजारी पडलो. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी आईला मला हाताने मारा, झाडाने नाही”, असे हसत-हसत अनुपम खेर यांनी सांगितले.